Description
आधुनिक काळामध्ये समाजामध्ये विविध प्रकारच्या समस्या दिसून येतात. या समस्यांची व्याप्ती विचारात घेता एका समस्येमधून दूसरी समस्या स्वरूप धारण करीत असते. आजच्या काळामध्ये मानवी समाजाची बदलती जीवनशैलीचा विचार करता आरोग्याच्या संदर्भात समस्या मोठया प्रमाणात निर्माण होतांना दिसून येत आहे. या समस्येमुळे समाजामधील प्रत्येक व्यक्ती ढवळून निघतांना दिसून येतो. प्रत्येकाला सामाजिक जीवन जगत असतांना कधीना कधी आरोग्य विषयक समस्येला सामोरे जावे लागते यामुळे वैयक्तिक, कौटूंबिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न निर्माण होतात. कुटूंबामधील कर्त्या व्यक्तीच्या संदर्भात आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास संपूर्ण कुटूंब तणावाखाली येते शिवाय परिवाराच्या संदर्भात समस्या निर्माण होतात अशा स्थितीत आरोग्य विषयक बाबीच्या संदर्भात सामाजिक जागरूकता विकसित होणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्याच्या संदर्भात जाणिव जागृती विकसित होऊन, आरोग्य विषयक समस्या सोडवणे शक्य आहे त्यांची सोडवणूक होऊ शकेल. या संदर्भ ग्रंथामध्ये सामाजिक आरोग्याच्या संदर्भात विविध घटकांची चर्चा करण्यात आली आहे.
Reviews
There are no reviews yet.